पुण्यातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळ मारुती सुझुकी कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाल्याचं वृत्त आहे.
अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळ मारुती सुझुकी या वाहनांच्या गोडाऊनला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान साहित्य जळून गेले आहे. या आगीवर काही तासात नियंत्रण मिळविण्यात यश आले असून ही आग नेमकी कशामुळे लागली. हे अद्यापपर्यंत समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले आहे. आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात असल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं आहे.
WhatsApp us