बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे हिने ‘साहो’ सिनेमाच्या निर्मात्यांवर चित्रचोरीचा आरोप केला आहे. शुक्रवारी लिसाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक छायाचित्र पोस्ट करत लांबलचक पोस्ट लिहीली. साहो सिनेमात शिलो शिव सुलेमान या कलाकाराचं चित्र कॉपी करून एका पोस्टरमध्ये वापरण्यात आल्याचं लिसाचं म्हणणं आहे.
लिसाने दोन्ही चित्रं शेअर केली आहे. एकात मूळ चित्र आहे आणि दुसऱ्या छायाचित्रात साहोतील एक पोस्टर आहे ज्यात प्रभास आणि श्रद्धा कपूर दिसत आहे. लिसाने लिहिलंय, ‘आपल्याला पुढे येऊन आवाज उठवायला हवा. बिग बजेट सिनेमाच्या प्रोडक्शनमध्ये शिलो यांच्या मूळ चित्रात फेरफार करून ते वापरण्यात आलं. ही प्रेरणा नव्हे, खुलेआम चोरी आहे. हे कुठेही स्वीकारल जाणान नाही. प्रोडक्शनने कलाकाराशी संपर्क साधून परवानगी घेण्याची किंवा त्याला श्रेय देण्याचीही तसदी घेतलेली नाही. हे योग्य नव्हे.’
