ठाण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असतानाच घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. आधीच मुसळधार पाऊस त्यातच आनंदनगर येथे टेम्पो उलटला, तर कासारवडवली जवळ मिनीट्रक ब्रेक डाऊन झाल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तासाभरापासून स्थिती अशीच असून ट्रॅफिक जामने प्रवासी हैराण झाले आहेत.
WhatsApp us