देशभरात कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. हिंदुस्थानला कोणत्याही परिस्थितीत युद्ध नको आहे. मात्र, शेजारी राष्ट्राने चिथावणी दिल्यास पाकिस्तानला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. पाकिस्तानला 1965,1971 आणि 1999 च्या युध्दापेक्षा कठोर धडा शिकवू असा इशारा राजनाथ यांनी दिला आहे. लष्करातील जवानांच्या साहसाचा आम्हाला अभिमान आहे. देशहित आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह बोलत होते.
1999 च्या कारगिल युद्धानंतर लष्कराचे आधुनिकीकरण झाले आहे. अद्यायावत शस्त्रास्त्रे लष्कराकडे आहेत. त्यामुळे आगामी काळात युद्ध झाल्यास पाकिस्तानला कठोर धडा शिकवण्यात येईल, असे ते म्हणाले. मात्र, हिंदुस्थानला युद्ध नको आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
