Nation

जम्मू-काश्मीर कलम ३७० मुक्त, लोकसभेतही विधेयक मंजूर

राज्यसभेपाठोपाठ आज लोकसभेतही जम्मू-काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यात आलं. हे विधेयक ३६७ विरुद्ध ६७ मतांनी मंजूर करण्यात आलं. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन्ही राज्ये अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम ३७० मधील तरतुदी हटविण्याचा प्रस्तावही ३५१ विरुद्ध ७२ मतांनी मंजूर करण्यात आला आहे. हे विधेयक आणि प्रस्ताव राष्ट्रपतींकडे मंजूरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे काश्मीर कलम ३७० मुक्त करण्याचं भाजपचं स्वप्न साकार झालं आहे. 

काल सकाळी ११ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलमातील तरतूदी रद्द करण्याच्या प्रस्तावाबरोबर जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचं आणि जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचं विधेयक लोकसभेत मांडलं. त्यावर सभागृहात प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी सभागृहातील सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अमित शहा यांनी उत्तरं दिली. त्यानंतर सायंकाळी सव्वा सात वाजता या विधेयकांवर मतदान घेण्यात आलं.

यावेळी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० अंतर्गत येणाऱ्या तरतुदी हटविण्याचा अंतर्भाव असलेल्या सामाजिक संकल्प प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं. या विधेयकाच्या बाजूने ३५१ मते पडली तर विधेयकाच्या विरोधात ७२ मते पडली. एकूण ४२४ सदस्यांनी यावेळी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. तर एक खासदार अनुपस्थित राहिला. त्यानंतर जम्मू-काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयकावर मतदान घेण्यात आलं असता मतदानाच्या बाजूने ३६७ आणि विरोधात ६७ मते पडली. यावेळी जम्मू-काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयकही मंजूर करण्यात आलं. ही सर्व विधेयकं संविधानिक प्रक्रियेनुसारच मंजूर करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

News is information about current events. News is provided through many different media: word of mouth, printing, postal systems, broadcasting, electronic communication, and also on the testimony of observers and witnesses to events. It is also used as a platform to manufacture opinion for the population.

Contact Info

West Bengal

Eastern Regional Office
Indsamachar Digital Media
Siddha Gibson 1,
Gibson Lane, 1st floor, R. No. 114,
Kolkata – 700069.
West Bengal.

Office Address

520, Asmi Industrial Complex, Near Ram Mandir Railway Station, Goregaon West, 400104, Mumbai, Maharashtra.

Download Our Mobile App

IndSamachar Android App IndSamachar IOS App
To Top
WhatsApp WhatsApp us