राज्य विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत आहे. राज्यातील सत्ता स्थापनेच्या सध्याच्या पेच प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याचे अॅंडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांना कायदेशीर बाबींवर सल्लामसलत करण्यासाठी आज राजभवनावर बोलावलं होतं.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही आज राज्यपालांची भेट घेतली.
