कोल्हापूरमध्ये सलग सहाव्या दिवशी पूरस्थिती कायम आहे. कोल्हापूर आणि सांगलीकरांना शक्य तितकी मदत सर्वसामान्यही करत आहेत. यात मराठी कलाकारही मागे नाहीत. अनेक मराठी कलाकार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. अभिनेते- खासदार अमोल कोल्हे यांची निर्मितीसंस्था जगदंब क्रिएशननंदेखील असाच एक उपक्रम हाती घेतला आहे. या निर्मितीसंस्थेच्या अंतर्गंत सुरू असणाऱ्या मालिकेच्या टीमनं त्यांचं एका दिवसाचं मानधन पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
जगदंब क्रिएशननं सोशल मिडीयावर पोस्ट करून ही माहीती दिली आहे. ‘जगदंब क्रिएशन या निर्मितीसंस्थेच्या बॅनरखाली ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता दोन मालिकांची निर्मिती सुरू आहे. या दोन्ही मालिकांच्या कलाकारांनी व तंत्रज्ञांनी एका दिवसाचं मानधन पूरग्रस्ताना देण्याचं ठरवलं आहे.
