भरधाव वेगात असलेल्या काळीपिवळीचा (वडाप) टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली काळीपिवळी पूलावरून थेट ८० फूट नदीत कोसळली. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये पाच विद्यार्थीनी व एका महिलेचा समावेश आहे.
मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास लाखांदूर मार्गावरील धर्मापूरी येथील चुलबंद नदीपुलावर ही घटना घडली.
गुणगुण हितेश्वर पालांदूरकर (१५) रा. गोंदिया, शीतल राऊत (१८) रा. सानगडी, अश्विनी सुरेश राऊत रा. सानगडी, शिल्पा श्रीराम कावळे (२०) रा. सासरा, सुरेखा देवाजी कुंभरे (१८) रा. सानगडी व शारदा गजानन गोटेफोटे (५५) रा. सासरा अशी मृतांची नावे आहेत.
WhatsApp us