मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर, आज संध्याकाळी शिवसेना भवनात शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली.
त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचं सूत्रं अमित शहा यांच्या उपस्थितीतच ठरलं होतं. आता मला खोटारडा ठरवण्याचा प्रयत्न होत आहे, असं उद्धव म्हणाले.
मुख्यमंत्री फडनवीस यांनी स्वतःच सांगितल्याप्रमाणे केलेली अचाट कामं आमच्याशिवाय झाली असती का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. गोड बोलून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न होत आहे, असंही ते म्हणाले.
WhatsApp us