PMC बँक घोटाळा प्रकरणात HDIL च्या दोन संचालकांना अटक करण्यात आली आहे. सारंग वाधवान आणि राकेश वाधवान अशी या दोघांची नावं आहेत. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. ४ हजार ३३५ कोटींचा हा घोटाळा आहे. याआधी याप्रकरणात १० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी HDIL च्या दोन संचालकांना अटक करण्यात आली आहे.
सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेने १० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केला. RBI च्या आदेशावरुन एचडीआयएल आणि बँकेच्या दहा पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाया गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूकही करण्यात आली आहे. पीएमसी बँकेचा घोटाळा ४३३५ कोटींचा असल्याचंही समोर आलं आहे.
