वायू चक्रीवादळ अधिक तीव्र झालं असून हे वादळ आज सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईपासून ४१० किलोमीटर सागरी अंतरावरून गुजरातच्या दिशेने सरकले असल्याची माहिती देतानाच उद्या (बुधवारी) मुंबई व कोकणात गडगटाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वायू चक्रीवादळ अधिक तीव्र झालं असून हे वादळ आज सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईपासून ४१० किलोमीटर सागरी अंतरावरून गुजरातच्या दिशेने सरकले असल्याची माहिती देतानाच उद्या (बुधवारी) मुंबई व कोकणात गडगटाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने मुंबई, कोकणात उद्या वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात, तर रायगड, रत्नागिरी येथे सरींची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र वायू वादळामुळे राज्यातील मान्सूनवर परिणाम होऊन राज्यात सर्वदूर मान्सून आगमनासाठी पुढील आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
WhatsApp us