मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी पोस्टर झळकावली आहेत. ‘मी पुन्हा येणार तुमच्या कोंबड्या चोरताना पाहायला’, ‘पक्षात येताय की ईडी पाठवू, ज्यांचे नाव घेऊन सत्तेत आले त्यांचेच किल्ले विकायला काढले, हे माझे सरकार’ या आशयाचे हे पोस्टर संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत.
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले. रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात ही पोस्टरबाजी केली. या पोस्टरच्या माध्यमातून राष्ट्रवादीनं फसवी कर्जमाफी, कडकनाथ कोंबडी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. ‘जादूगार मोदी आले, जादूची कांडी फिरवली आणि सगळं बदलून गेलं’ अशी उपरोधिक टीकाही केली आहे. ‘मी पुन्हा येणार फसवी कर्जमाफी द्यायला, तुम्ही पुरात बुडा आम्ही सेल्फी घेणार’
