सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचा मार्ग शिवसेनेनं निवडू नये पक्षाच्या प्रतिमेसाठी ते घातक ठरेल, असं केंद्रीय मंत्री, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
भाजप आणि शिवसेना यांची युती नैसर्गिक आहे, जनतेनंही युतीलाच बहुमताचा कौल दिला आहे. शिवसेनेनं तो डावलू नये. भाजपासोबत वाद मिटवून तडजोड करुन एकत्र सरकार स्थापन करावं, असं आवाहन आठवले यांनी केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेना सरकार स्थापन करु शकते मात्र ते अल्पावधीत कोसळेल, तेव्हा असा आत्मघात शिवसेनेनं करु नये, असा सल्ला त्यांनी दिला.
