वडाळा पूर्वेतील एका इमारतीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. यात 15 रहिवाशांना त्रास झाला. त्यांना ताबडतोब उपचारांसाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
श्री गणेश साई इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील आग लागल्यामुळे अग्निशमन दलाला शुक्रवारी सकाळी 3.33 वाजता फोन आला. चार फायर इंजिन्स, वॉटर टँकर आणि अॅम्बुलन्स ताबडतोब अपघातस्थळी पाठविण्यात आले.फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सुमारे 4 च्या आसपास आग विझवली गेली.
