पुण्यातील लोणावळा, मावळ परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्यांनी, नाल्यांनी, ओढ्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या भागातील पूल पाण्याखाली गेल्याने या परिसरातील काही गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
लोणावळ्यात २४ तासांत ३०१ तर पवनाधरण पाणलोट क्षेत्रात ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात ३६.६५ टक्के पाणीसाठा झाला आहे. पुण्यातील लोणावळा, मावळ परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्यांनी, नाल्यांनी, ओढ्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या भागातील पूल पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. लोणावल्याजवळील भाजेलेणी धबधबा सायंकाळी पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी दिली आहे.
