गणेशोत्सवाच्या आगमनाबरोबर परतलेल्या पावसानं राज्यात ठाण मांडलं असून दिवसेंदिवस त्याचा जोर वाढतच आहे. काल मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्याला झोडपणाऱ्या पावसानं रात्रीपासून पश्चिम महाराष्ट्र, कोकण व विदर्भाला झोडपून काढलं आहे. गडचिरोलीत १०० गावांचा संपर्क तुटला आहे. तर, कोकण व पुण्यात धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लाइव्ह अपडेट्स:
मुंबईः रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं सायन-माटुंगा दरम्यान लोकलसेवा ठप्प
मुंबईः पावसामुळं विमानाची उड्डाणे अर्धा तास विलंबाने; येणाऱ्या विमानांच्या आकाशात घिरट्या
ठाणेः रेल्वे स्थानकात रुळांवर पाणी साचले
मुंबईः पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत; चर्चगेट- विरार लोकलसेवा सुरू
पुणेः पवना धरणातून १२ हजार ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; पवना नदी काठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा
पालघरः वसई, नालासोपारा परिसरात सखल भागात पाणी साचले
