राज्यात लवकरात लवकर नवं सरकार स्थापन होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
सत्तेच्या समीकरणात कोण काय म्हणत आहे यावर आपण काहीही बोलणार नाही, असं नमूद करताना त्यांनी या संदर्भात अधिक बोलणं टाळलं. राज्याला नव्या सरकारची आवश्यकता असून ती लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज नवी दिल्लीत काँग्रेस पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
