महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतक-यांना राष्ट्रीय आपत्ती मदत निधी मधून अर्थसहाय्य देण्याबाबत फडणवीस शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत.
फडणवीस यांनी काल अकोला जिल्ह्याचा दौरा करुन अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा आढावा घेतला आणि शेतक-यांना आवश्यक ती मदत देण्याचं आश्वासन दिलं. बुधवारपर्यंत पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील, असं त्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
राज्य सरकारनं शनिवारी शेतक-यांसाठी १० हजार कोटी रुपये मदतीची घोषणा केली होती.
शिवसेना आणि विरोधी पक्षांनी ही मदत अपूरी असल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकारनं यापूर्वी केलेल्या पाहणीनुसार ५४ लाख २२ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
