भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह इतर तीन अधिका-यांच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात 2 कोटी 89 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. ही माहिती सक्तवसुली संचालनालयानं पत्रकात दिली आहे.
सीबीआयनं भ्रष्टाचार आणि लाचलुपत कायद्यानुसार सह आयुक्त रमेश चंद्र सिंग यांच्यासह चौघांवर गुन्हा नोंदवला होता. त्या आधारावर मनी लाँड्रींग कायद्यानुसार तपास झाला.
या तपासात रोकड, सोनं, हि-यांचे दागिने आणि मुदत ठेवींची माहिती उघड झाली. कुटुंब सदस्यांच्या नावावर सिंग यांनी पदाचा लाभ उठवत अनेक गैरव्यवहार केले असून त्यांची मिळकत बेहिशोबी असल्याचं ईडीनं स्पष्ट केलं आहे.
