पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला आहे.
रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून ढिगाऱ्याखालून तीन जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यास यश आलं आहे.मृतांमध्ये एका दोन वर्षांच्या मुलीचा आणि एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.
या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
