पर्यावरणपूरक विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आणखी सवलत देण्याचे अर्थसंकल्पात जाहीर केले असून, या वाहन कर्जांच्या व्याजावर १.५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे, या संपूर्ण कर्जाच्या कालावधीमध्ये ग्राहकाला २.५ लाख रुपयांपर्यंत व्याजात सवलत मिळेल.
विद्युत वाहनांच्या किंमती किफायतशीर व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारने त्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. ही वाहने आणखी स्वस्त होण्याच्या दृष्टीने आता कर्जाच्या व्याजामध्ये अतिरिक्त १.५ लाख रुपयांची सवलत देण्यात आली आहे. देशातील ग्राहकांची संख्या विचारात घेऊन, भारत हे विद्युत वाहनांचे जगातील केंद्र व्हावे, यासाठी हा एक प्रयत्न आहे, असे त्यांनी नमूद केले.
विद्युत वाहनांपैकी दुचाकी आणि तिचाकी वाहनांची इंजिनक्षमता १५० सीसी करण्यात येणार असून, त्यासाठी अनुक्रमे २०२३ आणि २०२५पर्यंतचे लक्ष्य नीती आयोगाने ठेवले आहे. त्यापाठोपाठ व्याजामध्ये ही सवलत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय, या वाहनांच्या काही सुट्या भागांवरील आयातशुल्कही माफ करण्यात आले आहे.
WhatsApp us