प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारीत सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांचं कणखर नेतृत्व आणि कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रहिताचं रक्षण करण्याचा दुर्दम्य निर्धार अधोरेखित करतो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.
या निर्णयामुळे देशातले शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, दुग्ध आणि उत्पादन क्षेत्र, पोलाद आणि रासायनिक उद्योगांना मदत मिळेल, असं त्यांनी ट्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे.
