महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी विनंती फडणवीस यांनी यावेळी केली. गृहमत्री पिक विमा कंपन्यांबरोबर भेट घेवून राज्याला अधिकाधिक मदत मिळवून देतील, असं मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांना सांगितलं.
