महाविकास आघाडीचं खातेवाटप आज जाहीर झालं. शिवसेनेनं आपल्याकडे गृहखातं ठेवलं असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ तर, काँग्रेसकडे महसूल खातं देण्यात आलं आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह, नगरविकास, वन आणि पर्यावरण, पर्यटन, ससंदीय कार्य खातं देण्यात आलं आहे.
जयंत पाटील अर्थ, नियोजन, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण, अन्न आणि नागरी पुरवठा विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन विभाग सोपवण्यात आला असून सुभाष देसाईंकडे उद्योग, कृषी, उच्च आणि तंत्रशिक्षण, परिवहन, क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
डॉ नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, वस्त्रोउद्योग, महिला आणि बालविकास तर, छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा अन्न आणि औषध प्रशासन आणि सामाजिक न्याय विभाग सोपवण्यात आलं आहे.