मराठी

भारतात सर्व छान चाललं आहे: PM मोदी

PM Modi arrives in New York for 74th UN General Assembly session

‘भारतात सर्व छान चाललं आहे’, अशी ख्याली खुशाली सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ह्यूस्टनमधील ‘हाउडी मोदी’ या ऐतिहासिक कार्यक्रमात अमेरिकेतील हजारो अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. ‘मोदी एकटा काहीही करू शकत नाही. मी १३० कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणारा माणूस आहे’, असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. 

हाउडी’चा अर्थ होतो ‘काय चाललंय’, असा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी मराठीसह गुजराती, बंगाली, पंजाबी अशा विविध भारतीय भाषांत ‘भारतात सर्व काही छान चाललं आहे’ असं सांगितलं आणि उपस्थितांची मने जिंकली. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाला डोनाल्ड ट्रम्पही टाळ्या वाजवून दाद देत होते. 

‘हाउडी मोदी’ कार्यक्रमामध्ये सुरुवातीचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आगमन झाले. मोदी यांनी ट्रम्प यांचे स्वागत करून ‘अब की बार ट्रम्प सरकार’ असा नारा दिला. मोदी यांनी सुरुवातीला इंग्रजीतून भाषण केले. त्यानंतर ट्रम्प यांचे भाषण झाले. ‘दोन्ही देश सुरक्षेवर एकत्रित काम करत असून भारत आणि अमेरिका इस्लामिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत,’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिंदीतून दीर्घ भाषण झाले. मोदी यांनी या भाषणामध्ये देशातील बदलांचा आणि विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. ‘भारत आता भारतालाच आव्हान देत आहे. आम्ही बदलत आहोत. आमच्या बदलाची हीच खूण आहे’, असे मोदी यांनी यावेळी विश्वासाने सांगितले.

‘भारताचा खरा मित्र जगात कोणी असेल तर तो व्हाइट हाउसमध्येच आहे. भारत आणि अमेरिका मैत्रीचे नवे पर्व आता सुरू झाले आहे. ह्युस्टनपासून हैदराबादपर्यंत, बोस्टनपासून बेंगळुरू, शिकागोपासून शिमला आणि लॉस एंजलिसपासून लुधियानापर्यंत भारत आणि अमेरिकेचे संबंध दृढ होत चालले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत आणखी एक विक्रम झाला. पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले सरकार पुन्हा बहुमताने निवडून आले. २०१९च्या निवडणुकीत सर्वाधिक महिला निवडून आल्या. आपल्या देशात फक्त भाषाच नव्हे तर, सण-पंरपरा, ऋतू, रितीरिवाज आहेत. विविधेत एकता हाच लोकशाहीचा आधार असून, तीच शक्ती आणि प्रेरणा आहे. कार्यक्रमाचे नाव ‘हाउडी मोदी’ असे नाव आहे. मात्र, १३० कोटी भारतीयांशिवाय मोदी काहीच नाही हे लक्षात घ्यायला हवे. जगातील सर्वात स्वस्त डेटा भारतात उपलब्ध आहे. भारतात आता २४ तासांत नव्या कंपनीची नोंदणी होते. पाच वर्षांत आता जवळपास १०० टक्के कुटुंब बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले. नवीन भारताच्या निर्मितीसाठी आमची स्पर्धा आमच्यासोबतच आहे. या कार्यक्रमाला हजारो जण उपस्थित आहेत. मात्र, जागेअभावी ज्या नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही, त्यांची मी क्षमा मागतो. भारतासमोर गेल्या ७० वर्षांपासून एक महत्त्वाचा प्रश्न होता. मात्र, हा प्रश्न काही दिवसांपूर्वीच आम्ही सोडवला. कलम ३७० रद्द करून काश्मिरींना प्रवाहात आणले. कलम ३७० मुळे दहशतवाद वाढीस लागला होता. आता काश्मीरचा विकास शक्य होईल’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

पाकवर डागली तोफ 

ज्या लोकांना स्वत:चा देश सांभाळता येत नाही ते लोक भारत अशांत होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हेच लोक दहशतवादाला पोसतात आणि त्याला खतपाणी घालतात, अशा शब्दांत पाकिस्तानचे नाव न घेता मोदींनी तोफ डागली. अमेरिकेवरील आणि भारतावरील दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणारे कोणत्या देशात आढळतात?, असा सवाल करत दहशतवादाविरोधात एकत्र येऊन निर्णायक लढा देण्याची गरज आहे, असे आवाहन मोदींनी केले. 

35 Comments

35 Comments

  1. Pingback: 바카라 사이트 제작

  2. Pingback: togel master

  3. Pingback: google chrome indir

  4. Pingback: delivermymulch.info

  5. Pingback: uniccshop.bazar

  6. Pingback: ghi so de

  7. Pingback: Eddie Frenay

  8. Pingback: bitcoin era

  9. Pingback: 메이저놀이터

  10. Pingback: Library

  11. Pingback: wig

  12. Pingback: lace front wigs

  13. Pingback: DevOps Outsourcing companies

  14. Pingback: 풀팟포커

  15. Pingback: Climatizare

  16. Pingback: real dumps online

  17. Pingback: dmt

  18. Pingback: เว็บสล็อตใหม่ล่าสุด

  19. Pingback: scooter rental in honolulu

  20. Pingback: คาสิโนออนไลน์เว็บตรง

  21. Pingback: Peut Ton Gagner De L'argent Sur Cam4 Étant Un Homme

  22. Pingback: สล็อตวอเลท

  23. Pingback: สล็อตออนไลน์

  24. Pingback: Leandro Farland

  25. Pingback: pain and cbd

  26. Pingback: Plantation Shutters

  27. Pingback: Buy DMT Powder Online Australia

  28. Pingback: National Chi Nan University

  29. Pingback: Future University in Egypt

  30. Pingback: Immunizations

  31. Pingback: Get in Touch with Faculty of Engineering and tecnology

  32. Pingback: FCIT Research and Innovation

  33. Pingback: Application deadlines for future university

  34. Pingback: pmma crystal structure,

  35. Pingback: 호두코믹스

Leave a Reply

Your email address will not be published.

two × four =

News is information about current events. News is provided through many different media: word of mouth, printing, postal systems, broadcasting, electronic communication, and also on the testimony of observers and witnesses to events. It is also used as a platform to manufacture opinion for the population.

Contact Info

Address:
D 601  Riddhi Sidhi CHSL
Unnant Nagar Road 2
Kamaraj Nagar, Goreagaon West
Mumbai 400062 .

Email Id: [email protected]

West Bengal

Eastern Regional Office
Indsamachar Digital Media
Siddha Gibson 1,
Gibson Lane, 1st floor, R. No. 114,
Kolkata – 700069.
West Bengal.

Office Address

251 B-Wing,First Floor,
Orchard Corporate Park, Royal Palms,
Arey Road, Goreagon East,
Mumbai – 400065.

Download Our Mobile App

IndSamachar Android App IndSamachar IOS App
To Top
WhatsApp WhatsApp us