भारतीय हवाई दलाचे बेपत्ता विमान एएन-३२ चे अवशेष दिसल्याची माहिती समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यात हे अवशेष दिसल्यामुळे गेले अनेक दिवस सुरू असलेल्या शोधमोहिमेला वेग आला आहे. भारतीय हवाई दलाकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
आसाम येथून ३ जून रोजी एएन-३२ या विमानाने १३ जणांसह उड्डाण केले होते. या विमानाशी दुपारी १ वाजता अखेरचा संपर्क झाला होता, यानंतर या विमानाशी असलेला संपर्क तुटला होता. भारतीय हवाई दलाने शोधमोहिम सुरू केली होती. मात्र, खराब हवामानामुळे ठोस गोष्ट हाती लागत नव्हती.
