भारत आणि श्रीलंकेच्या लष्करादरम्यान सातव्या ‘मित्रशक्ती’ लष्करी सरावाला काल पुणे इथल्या औंध लष्करी केंद्रात सुरुवात झाली. दोन्ही देशातल्या लष्करांमधलं सहकार्य आणि सामंजस्य वाढण्यासाठी हा एकत्रित सराव असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं.
घुसखोर आणि दहशतवाद्यांविरोधातल्या नागरी तसंच ग्रामीण क्षेत्रातल्या कारवायांसंदर्भात कनिष्ठ पातळीवर प्रशिक्षण देण्याचा या सरावाचा हेतू आहे.