घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत गिरणी कामगारांसाठी लवकरच तब्बल ५,०९० घरांची लॉटरी निघणार आहे.
म्हाडाने आज तशी घोषणा केली. या घरांसह राज्यभरात एकूण १४,६२१ घरांसाठी १५ ऑगस्टपर्यंत जाहिरात येणार आहे.
म्हाडाकडून पुनर्विकास धोरण येत्या १५ ते २० दिवसांत जाहीर होणार आहे. तसेच वसाहत सेवाशुल्क अहवाल १० दिवसात जाहीर होणार आहे.
दरम्यान, मुंबईत गिरणी कामगारांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार असले तरी सर्वसामान्यांच्या पदरी मात्र निराशा येणार आहे. कारण त्यांच्यासाठी म्हाडाने कोणतीही घोषणा केलेली नाही.
