महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ – एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त दहा हजार रुपये अग्रीम देण्यात येणार आहे. अग्रीमसाठी कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करण्यास सुरुवात केली असून, ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप अर्ज केले नाही, त्यांनी तातडीनं अर्ज करण्याचं आवाहन महामंडळानं जारी केलेल्या पत्रकात केलं आहे.
