केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून सीतारामन आज नवी दिल्ली इथं, उद्योजक संस्था, शेतकऱ्यांच्या संघटना तसंच, अर्थतज्ञांसह अर्थव्यवस्थेतल्या इतर भागधारकांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा करणार आहेत.
या सगळ्यांनी देशाच्या विकासाला चालना देण्याच्यादृष्टीनं महत्वाच्या सूचना कराव्यात अशी अपेक्षा सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. यानंतर त्या वित्तीय आणि भांडवली क्षेत्राच्या प्रतिनिधींचीही भेट घेणार आहेत.