महा चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयं सहा ते आठ नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालघर आणि शेजारच्या ठाणे जिल्ह्यातल्या मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशाराही जारी करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी या दोन जिल्ह्यांमधल्या स्थितीचा आढावा घेतला आहे.
