शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु, गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्तानं देशभरात ‘प्रकाश पर्व’ साजरं होतं आहे. १४६९ मधल्या कार्तिक पौर्णिमेला गुरुनानक यांचा जन्म झाला. या दिवशी शीख भक्त- भाविक विविध ठिकाणी लंगर आयोजित करतात कार्तिक पौर्णिमेला देव दीपावलीही साजरी केली जाते.
गुरुनानकांनी पंधरा वर्षे वास्तव्य केलेल्या सुलतानपूर लोधी या ऐतिहासिक शहराला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सपात्निक भेट देऊन दर्शन घेतलं. गुरुनानक यांनी प्रेम, अनुकंपा, एकता, आणि सौहार्द्रतेची शिकवण दिली, असं राष्ट्रपतींनी सांगितलं.
माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नांदेडच्या हुजूर साहिब सच्चखंड गुरुद्वारा इथल्या कार्यक्रमात सहभागी झाले.
पटना इथल्या तख्त श्री हरिमंदिर साहिब गुरुद्वारात अनेक भाविकांनी गुरु पुरब निमित्त दर्शन घेतलं. देशविदेशातल्या गुरुद्वारातही अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.
गुरुनानक जयंतीनिमित्त, राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
