महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले. ९० वर्षीय लतादीदी या गेल्या काही दिवसांपासून तब्येतीत बिघाड झाल्यामुळे रुग्णालयात भरती आहेत. यात वेळातवेळ काढून उद्धव ठाकरे त्यांना भेटायला ब्रीच कँडीला गेले.
ब्रीच कँडीतील अतीदक्षता विभागात लतादीदी ११ नोव्हेंबरपासून भरती आहे. लतादीदींना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या ७० वर्षांपेक्षाही जास्त काळ लतादीदींनी संगीत क्षेत्रावर अधिराज्य केलं. २००१ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज, शनिवारी विधानसभेत मांडला जाणार असून, त्यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता सत्ताधारी आघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव आणला जाईल.
