डबा धुतला नाही म्हणून पायलट आणि विमानातील एका वरिष्ठ क्रू मेंबरचे भांडण झाले आणि एअर इंडियाच्या विमानाच्या टेक ऑफला दोन तास विलंब झाल्याची घटना बेंगळुरू विमानतळावर घडली आहे. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली असून एयर इंडियाने या प्रकाराची नोंदघेत दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं आहे.
एयर इंडियाच्या बेंगळुरू-कोलकाता विमानात ही घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पायलटने आधी या कर्मचाऱ्याला डब्यातील जेवण गरम करण्यास सांगितले. जेवण झाल्यानंतर त्याने हा डबा धुवून आण असे त्या कर्मचाऱ्याला सांगितले. त्या कर्मचाऱ्याने डबा धुण्यास नकार देताच पायलट चिडला आणि ओरडायला लागला. काही वेळातच दोघंही हमरीतुमरीवर आले. विमानातील प्रवाशांसमोरच त्यांनी एकामेकाला हाणामारी करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून प्रवासी थक्क झाले. एयर इंडियाच्या व्यवस्थापनालाही याची माहिची मिळताच त्यांनी लगेच दोघांना विमानातून बाहेर काढलं. नवीन पायलटची व्यवस्था व्हायला बराच वेळ लागला. यामुळे विमानाच्या टेक ऑफला दोन तास उशीर झाला. प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
या दोघांचीही चौकशी एयर इंडिया करत असून दोघांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
