पंजाबच्या गुरूदासपूर जिल्ह्यातील बाटला येथील एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले असून दोन इमारतीत ५० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आजुबाजुच्या परिसरातील लोकांमध्ये भीती पसरली आहे.
आज दुपारी चारच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहेत. त्यांच्यावर त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच दोन इमारतीत ५० जण अडकल्याची माहिती आहे. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथक प्रयत्न करीत आहेत. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथक प्रयत्न करीत आहे. स्फोटानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. या धुरामुळे लोकांना बाहेर काढताना अडचण येत आहे, असे बचाव पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान, या कारखान्या परवानगी होती की तो अनधिकृत होता याची अद्याप माहिती समोर आली नाही.
