‘केंद्र सरकार संवैधानिक सुरक्षा, भाषा, संस्कृती और असामची प्रादेशिक संस्कृती कायम राखण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आज, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर मोदी यांनी भारतासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत १२५ विरुद्ध १०५ मतांनी मंजूर झाले. १९५५ मधील नागरिकत्व विधेयकात दुरुस्ती करण्यात आल्याने पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या विविध ६ धर्मीय निर्वासितांना भारताचं नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला होता. भारतासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. बंधुभाव आणि दयेच्या दृष्टीकोनातून भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले होते.
केंद्र सरकार संवैधानिक सुरक्षा, भाषा आणि आसामच्या प्रादेशिक संस्कृतीप्रति कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी आज दिली. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर चिंता करण्याची गरज नाही अशी ग्वाही मी आसामच्या लोकांना देऊ इच्छितो. तुमची विशेष ओळख, अधिकार आणि संस्कृती कायम आणि अधिकाधिक समृद्ध होत राहील, असं मोदी म्हणाले.