मुंबईतील माजी खासदार किरीट सोमय्या यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांच्याबरोबरच डॉ. सुभाष भामरे, प्रवीण पोटे पाटील, योगेश गोगावले आणि अशोक कांडलकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या नव्या नियुक्त्या केल्या आहेत.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच आज काही संघटनात्मक बदल केले आहेत. ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी विकास रासकर तर उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जालनाच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्षपदी गिरीश पालवे, यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
