बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात भारताच्या पूजा गेहलोतनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
पुजानं २०१८ च्या कनिष्ट युरोपियन स्पर्धेची सुवर्ण पदक विजेती, तुर्कीच्या झेनेप येतगीलला ८-४ असं नमवलं.
अंतिम फेरीत पुजाचा सामना जपानच्या हारुनो ओकुनो बरोबर रंगणार आहे.
भारताच्या ज्योतीला रशियाच्या नडेझदा सोकोलोवाने हरवल्यामुळे भारताचं चौथं पदक थोडक्यात हुकलं.
