तब्बल २१ तासांच्या उत्साहपूर्ण, जल्लोषात आणि ढोलताशांच्या दणदणाटात निघालेल्या मिरवणुकीनंतर आज सकाळी साडे आठच्या सुमाराला ‘लालबागच्या राजा’चे गिरगावच्या समुद्रात शाही विसर्जन करण्यात आले. दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर अखेरची आरती घेऊन बाप्पाला अलोट गर्दीच्या साक्षीने गिरगाव चौपाटीच्या खोल समुद्रात निरोप देण्यात आला. निरोपाचा क्षण जवळ आल्यानंतर ‘ गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’च्या गजरात लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.
