देशात 5344 मोठी धरणे आहेत. त्यातील 293 धरणे शंभर वर्षे जुनी आहेत. धरणांची सुरक्षा आणि देखभालीसाठी राष्ट्रीय धोरण ठरविण्याकरिता केंद्र सरकारने एक विधेयक आज लोकसभेत सादर केले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी हे विधेयक सादर केले. धरणांच्या सुरक्षेबाबत धोरण ठरविण्यासाठी एक राष्ट्रीय कमिटी स्थापन केली जाईल, असे शेखावत यांनी सांगितले. देशात 5344 मोठी धरणे आहेत. त्यातील 293 धरणे शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. 1041 धरणे 50 ते 100 वर्षे जुनी आहेत. 92 टक्के धरणांचे बांधकाम दोन राज्यांमधून वाहणाऱया नद्यांवर बांधली गेली आहेत, अशी माहिती शेखावत यांनी दिली.
लोकसभेत सादर केलेल्या विधेयकात राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाबरोबरच एक राष्ट्रीय कमिटी स्थापन केली जाईल, असे म्हटले.
राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण हे धोरण ठरवून अंमलबजावणीही करणार आहे. धरणांची सुरक्षा, देखभाल, दुरुस्ती याबाबत प्राधिकरणाने धोरण निश्चित केले. दोन राज्यांमध्ये धरणाबाबत काही प्रश्न असतील तर तेही सोडविले जातील.
धरण प्राधिकरणाने केलेल्या सूचनांचे पालन करून त्याची अंमलबजावणी करणे हे राज्यांच्या धरण सुरक्षा यंत्रणेला बंधनकारक असणार आहे.
