भाजपानं महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सरकार स्थापनेबाबत विचारणा केली आहे.
भाजपा सरकार स्थापन करणार नसल्याचं काल भाजपाच्या शिष्टमंडळानं स्पष्ट केल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेचे विधीमंडळ पक्ष नेते एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्याचा इच्छा आणि क्षमता याबाबत विचारणा केली. त्यानंतर शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आमदार शिवसेना पक्षप्रमुखांच्या मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले.
काँग्रेसनं याबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही, तर शिवसेनेनं भाजपाशी युती तोडावी त्यानंतरचं शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत विचार करु असं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं आहे.
