मध्यरात्रीपासून मुंबई उपनगरांत संततधार सुरूच असून पुढीव काही तास मुंबई उपनगरांमध्ये जोरदार पाऊस कोसळेल अशा इशारा हवामान विभागाने दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकरांनी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे अशी सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. दरम्यान आज सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होत असल्याने विसर्जन मिरवणूकांमध्ये आपल्या सहभागी होता येईल की नाही, याची चिंता मुंबई उपनगरांमधील गणेशभक्तांनी सताऊ लागली आहे.
मुंबई शहरात देखील मध्यरात्रीपासून पाऊस पडत असून आज सकाळी मुंबईतील सखल भाग असलेल्या सायन, दादर आणि हिंदमाता परिसरात पावसाचे पाणी साचले. आज रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईकर मोठ्या प्रमाणावर गणपती गणेश दर्शनासाठी जाऊ शकतात. हे लक्षात घेत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे असा इशारा देण्यात आला आहे.
