महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरात सुरु होत असून, ते 21 डिसेंबरपर्यंत चालेल. या अधिवेशनात अवकाळी ग्रस्त शेतक-यांना कर्जमाफी, विविध प्रकल्प स्थगिती या मुद्यांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. अधिवेशानात तारांकित प्रश्नोत्तराचा तास होणार नाही. अशा प्रकारचं हे पहिलेच अधिवेशन असणार आहे.
दरम्यान, न्यायपालिकेकडून घटनात्मक पडताळणी तसंच पक्षानं उपस्थित केलेल्या शंकाच निरसन झाल्यावरचं नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत आपलं सरकार निर्णय घेईल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं हिवाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला काल आयोजित चहापान कार्यक्रमात ते बातमीदांराशी बोलत होते.
केंद्र सरकार मुख्य मुद्यांवरुन जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. देशाच्या काही भागात परिस्थिती नियंत्रणात नसल्यामुळे अशांतता आणि भितीचं वातावरण असल्याचं ते म्हणाले. विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर भहिष्कार घातल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.
