चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं ओसंडून वाहणाऱ्या तिवरे धरणाला भगदाड पडून सात जणांचा मृत्यू झाला आहे.
धरणाच्या परिसरातील गावे पाण्याखाली गेली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप २४ जण बेपत्ता आहेत.
चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळं मंगळवारी रात्री तिवरे धरण भरून वाहू लागलं. काही वेळानं धरणाला भगदाड पडल्याचं लक्षात आल्यानं तलाठ्यांनी धरणाच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला. पण तासाभरातच धरण फुटलं आणि परिसरातील गावांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळं हाहाकार उडाला. बेंड गावातील घरे पाण्याखाली गेली. वाडीतील ग्रामस्थ वाहून गेले. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
