महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीकनुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाईल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचं राजभवननं प्रसिद्ध् केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
यासंदर्भात राज्य सरकारनं शाह यांना माहिती कळवली होती.
शिवसेनेच्या शिष्टमंडळानंही मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी काल केली होती.
