बेस्ट उपक्रमाने तिकीट दर कमी करण्याचा निर्धार केला आहे. आज, शुक्रवारी यावर बेस्ट समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. बेस्टच्या या पवित्र्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होण्याचे सुचिन्ह आहे.
बेस्टचा सर्वात मोठा प्रवासीवर्ग हा कमी अंतर प्रवास करणारा आहे. त्यामुळे ५ किमी अंतरासाठी साध्या बसचे ५ आणि एसीच्या केवळ ६ रु.च्या तिकिटांमुळे प्रवासी संख्येत भर पडण्याची शक्यता आहे. बसची संख्याही वाढणार असल्याने प्रवासी बेस्टकडे मोठ्या प्रमाणात वळतील, असा प्राथमिक अंदाज आहे.
