केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, शुक्रवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत.
अपडेट्स
रेल्वे रूळ बांधण्यासाठी पीपीपी मॉडेलला मंजुरी
सरकारी कंपन्यांच्या जमिनींवर अफोर्डेबल हाउसिंग योजना सुरू करणार
निधी उभारण्यासाठी सरकारी जमिनी विकणार
वीज निर्मिती क्षेत्राला चालना देणार
२०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मोठी सूट देणारः सीतारामण
राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेच्या रचनेत बदल करणार
भारताची अर्थव्यवस्था सध्या २.७ लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली
भारताची अर्थव्यवस्था जगात सध्या सहाव्या क्रमांकावर
अमेरिका आणि चीननंतर भारताची वाटचाल जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने
लघुउद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची आवश्यकता
भारताची अर्थव्यवस्था या वर्षी ३ लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर जाईल
जनतेच्या सहकार्याने देश प्रगतीची नवी उंची गाठेल
संसदेत अर्थसंकल्पाला सुरुवात
केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला दिली मंजुरी, निर्मला सीतारामण लवकरच संसदेत अर्थसंकल्प मांडणार
अर्थसंकल्पाच्या प्रति संसदेत आणल्या
