राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर येऊन ठेपल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. तर, काही ठिकाणी युतीमध्ये आपसातच तुंबळ सुरू आहे. निवडणुकीच्या या सर्व घडामोडींवर एक नजर…
लाइव्ह अपडेट्स:
>> अहमदनगर: निवडणुकीच्या वेळेलाच मंदिर व मस्जिद हा विषय का येतो? – कन्हैय्या कुमार
>> बीड: २१ ऑक्टोबरला सुट्टी साजरी करू नका; लोकशाहीचा उत्सव साजरा करा, मोदींचं जनतेला आवाहन
>> अहमदनगर: फडवणीस सांगत असतील मीच मुख्यमंत्री होणार आहे, तर निवडणूक घेण्याची गरज काय?- कन्हैय्या कुमार
>> बीड: गोदावरीच्या खोऱ्यात पाणी आणण्याचा महायुतीचा प्रकल्प विकासाचा आदर्श ठरेल – मोदी
>> बीड: ३७० रद्द करण्यात कुठलंही राजकारण नाही. भाजपच्या जन्मापासून आमचा या कलमाला विरोध होता – मोदी
>> बीड: थकलेले आणि मनाने हरलेले लोक तुमचं काही भलं करू शकतील का?; मोदींचा उपस्थितांना प्रश्न
>> बीड: ही गर्दी बघून काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना धडकी भरत असेल – मोदी
>> बीड: परळीच्या निवडणुकीत याआधीचे सर्व विक्रम मोडले जातील – मोदी
>> बीड: पंतप्रधान मोदी यांनी केली मराठीतून भाषणाला सुरुवात
>> बीड: पंतप्रधानांच्या आगमनामुळं आमच्या स्वप्नांना बळ मिळालयं- पंकजा मुंडे
>> बीड: परळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला सुरुवात; पंकजा मुंडे यांचं भाषण सुरू
>> माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा; बावनकुळे स्वत: सभा प्रमुख
