पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ांत गेल्या आठवडाभरापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागात पावसाचा विशेष जोर आहे. पुरामुळे पुणे-बंगळुरु महामार्गही ठप्प पडला असून अनेक गाड्या महामार्गावर अडकून पडल्या आहेत. साताऱ्यातही महामार्गावर अनेक ठिकाणी गाड्या अडकल्या आहेत. यामध्ये ट्रक चालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. पुरामुळे अडकून पडल्याने त्यांची गैरसोय झाली आहे. अशावेळी पोलीस आणि गावकरी त्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.
साताऱ्यातील वाठार येथील पोलीस आणि ग्रामस्थांनी पुरामुळे अडकलेल्या वाहन चालकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. पोलीस चालकांना जेवण वाढतानाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आधीच पुरामुळे झालेली वाहतूक कोंडी आणि मदतकार्यामुळे कामाचा बोजा असताना पोलिसांनी दाखवलेली ही माणुसकी कौतुकास्पद आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलीसानी
