सायन-पनवेल महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा डंपरला विचित्र अपघात झाला. महामार्गावरील दिशादर्शक फलकाच्या खांबाला डंपरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की डंपरच्या चालकाची कॅबिन वरच्या दिशेला गेली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातग्रस्त डंपर भरधाव वेगात असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यातून हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपघातात जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवांनी चालकाची सुटका केली. दरम्यान या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.
